Just another WordPress site

यवतमाळ येथील अनंतराव कोवे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

यवतमाळ-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२९ एप्रिल २४ सोमवार

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी मधुसूदन कोवे गुरुजी यांचे मोठे भाऊ अनंतराव कोवे यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने दुःखत निधन झाले असून सदरील बातमी ऐकताच येथील माजी आमदार वामनराव चटप यांनी त्यांच्या घरी जाऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.अनंतराव कोवे यांच्या निधनाबद्दल परिसरात एकच शोककळा पसरली आहे.

राळेगाव येथील रहिवाशी व एस टी महामंडळ मध्ये कार्यरत असलेले तसेच यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी मधुसूदन कोवे गुरुजी यांचे मोठे भाऊ अनंतराव कोवे यांचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने नुकतेच निधन झाले आहे.ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली.दरम्यान माजी आमदार ॲड.वामनराव चटप व कृष्णाजी भोंगाडे,जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ यांनी तातडीने अनंतराव कोवे यांच्या  घरी येऊन असे दुर्दैवी संकट कोणावरही येवू नये अशा दुःखत संवेदना ॲड.वामनराव चटप यांनी व्यक्त केल्या आहे.तसेच मधुसूदन कोवे गुरुजी यांना धिर देत आम्ही आपल्या कुटुंबात झालेल्या दुःखात सहभागी आहोत खेचुन जावु नका असा शोकसंदेश व्यक्त केला.प्रसंगी एसटी महामंडळचे सेवानिवृत्त अधिकारी दिलीपसिंह गौतम,दिपकराव फाले,कैलास राठोड,बंडु डोंगरे,कृष्णा भोंगाडे,चारुदत्त नेरकर,गोलु अडाने, मधुसूदन कोवे गुरुजी,माया मधुसूदन कोवे,वेद कोवे आणि ऋग्वेद कोवे यांच्यासह परीवारातील व्यक्तींकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.