तुम्ही कुणाबद्दल बोललात ? टरबूज ? म्हणजे कोण ? मी ज्यांना मागे फडतूस म्हणालो होतो ते का ? आता मी बोलत नाही.मी फडतूस म्हटले होते आता म्हणत नाही.मी त्यांना कलंक बोललो होतो पण आता बोलत नाही कारण त्यांना फार वाईट वाटते.त्यांनीच परवा रायगडमध्ये एक विनोद केला.बाकीची कामे सोडून द्या मोदींची,म्हणजेच मोदींनी काम केली नाही हे त्यांनी मान्य केले पण ते म्हणाले निदान मोदींनी आपल्याला करोना काळात लस दिली म्हणून आपण जिवंत राहिलो.जे काही संशोधक आहेत ते काय गवत उपटत होते का ? मोदींनी लस बनवली असेल तर ते काय करत होते ? लस पुण्यात तयार झाली आहे.मोदींनी लस हवेत सोडली नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंनी घणाघाती टीका केली आहे. टरबुजाचे काय करायचे ? तुम्हाला चांगलंच माहीत आहे.टरबुजाचे काय करायचे तुम्हाला माहीत आहे.टरबूज उन्हाळ्यात कामी तरी येते.हे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना आहे.हे टरबूज नाहीच दिवाळीत चिरडता ते चिराट झालेत.आले तेव्हा टरबूज होते आता पाव उपमुख्यमंत्री झालेत म्हणजेच चिराट झाले आहेत.होता केवढा झाला केवढा ? असे सगळे थापेबाजीचे राजकारण सुरु आहे असे म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींना खडे बोल सुनावले आहे.