Just another WordPress site

कोरपावली येथे हजरत पीर गयबनशाह बाबा दर्ग्यावर चादर चढवून केली प्रचाराची सुरुवात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१ मे २४ बुधवार

तालुक्यातील कोरपावली येथे काल दि.३० एप्रिल मंगळवार रोजी इंडिया आघाडीचे रावेर लोकसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार श्रीरामदादा पाटील यांच्या प्रचार फेरीची सुरवात हजरत पीर गयबनशाह बाबा यांच्या दर्ग्यावर चादर चढवून मोठ्या उत्साहाच्या वातावरणात करण्यात आली.

यावेळी इंडिया आघाडीचे रावेर लोकसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार श्रीरामदादा पाटील यांच्या समवेत यावल रावेरचे लोकप्रिय आमदार शिरीषदादा चौधरी,काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष आप्पासाहेब प्रभाकर सोनवणे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले,शेखरबापू पाटील,संदीपभैय्या सोनवणे,विजय पाटील,एम.बी.तडवी,अमोल भिरुड,प्रवीण घोडके,माजी सरपंच जलील पटेल,माजी सरपंच प्रेमचंद महाले,माजी सरपंच इस्माईल तडवी,उपसरपंच मुक्तार पटेल,विकास सोसायटी संचालक वसंत महाले,एकनाथ महाजन,उमेश जावळे, ग्रामपंचायत सदस्य आरिफ तडवी,सत्तार तडवी,ऍड.रियाज पटेल,नागो तायडे,अशोक चौधरी,रईस पटेल यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.