यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :_
दि.१ मे २४ बुधवार
रावेर लोकसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीरामदादा पाटील यांच्या प्रचारार्थ आज दि.१ मे २४ बुधवार रोजी संध्याकाळी ४ वाजेपासून यावल शहरात प्रचार फेरी काढण्यात येणार आहे.तरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट,काँग्रेस,शिवसेना उभाठा गट व सर्व मित्र पक्ष यांच्या शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रचार फेरीत उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेस कमिटी यावल शहर अध्यक्ष कदीर खान यांनी केले आहे.
दरम्यान आज दि.१ मे बुधवार रोजी संध्याकाळी ४ वाजेपासून शहरातील भास्कर नगर,फालक नगर,आयशा नगर,प्रभुदेलिला नगर,बालाजी सिटी या भागात रावेर लोकसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीरामदादा पाटील यांच्या प्रचारार्थ प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.तरी तरी तालुक्यातील महाविकास आघाडीतील मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट,काँग्रेस,शिवसेना उभाठा गट व सर्व मित्र पक्ष यांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रचार फेरीत उपस्थिती द्यावी असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस कमिटी यावल शहर अध्यक्ष कदीर खान यांनी केले आहे.