नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा झाली मात्र आम्ही ज्यावेळी त्यांच्याबरोबर होतो त्यावेळी त्यांना कधीही एवढ्या सभा घ्याव्या लागल्या नाहीत.आता त्यांच्या बरोबर जे आहेत ते ओझे वाहणारे गाढवे आहेत.मला आता त्यांची किव येते कारण त्यांना महाराष्ट्रात कधीही एवढ्या सभा घ्याव्या लागल्या नाही तेवढ्या सभा आता घ्याव्या लागत आहेत असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला.१० वर्ष झाले आहेत ते पंतप्रधान होते मात्र अजूनही ते काँग्रेसच्या नावाने ओरडत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेला महागाईचे चिमटे काढत आहेत पण ते चिमटे त्यांनी स्वत:ला काढून पाहावे कारण तुम्ही खरच पंतप्रधान होतात मात्र आता तुमची खुर्ची जाणार आहे.एवढ्या खालच्या पातळीवर टीका करता.शरद पवार यांना ते काय म्हणाले ? भटकती आत्मा.आता जशी भटकती आत्मा असती तशी ओकओकलेला आत्माही असतो असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.भाजपाने ४०० पारचा नारा दिलेला आहे.यावर भाजापाला संविधान बदलायचे आहे असा आरोप गेल्या काही दिवसांपासून विरोधक करत आहेत.यावरुनच आता उद्धव ठाकरे यांनी भाजपाला जाहीर इशारा दिला आहे.ते म्हणाले,“भाजपावाल्यांनो याद राखा,तुम्हाला आज जाहीर इशारा देत आहे.तुम्ही परत सत्तेवर येणार नाहीच पण घटनेला बदलण्यासाठी हात लावाल तर संपूर्ण देश पेटल्याशिवाय राहणार नाही एवढे लक्षात ठेवा” असा इशारा उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील सभेत बोलतांना दिला आहे.