पुढे बोलताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले की,“अमित शाह हे कधीच कोणत्या आंदोलनात सहभागी झाले नाही तसेच त्यांना गुजरातमध्ये तडीपार करण्यात आले होते व ते तुरंगातही जाऊन आले आहेत परिणामी त्यांच्याकडून आम्हाला नैतिक मुल्ये आणि विचारधारा शिकण्याची गरज नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे.दरम्यान पश्चिम बंगालमधील एका सभेत बोलतांना ममता बॅनर्जी यांना त्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांना मुख्यमंत्री बनवायचे आहे अशी टीका अमित शाह यांनी केली होती.या टीकेला अभिषेक बॅनर्जी यांनी प्रत्युत्तर दिले असून “काहीही संबंध नसतांना अमित शाह यांनी त्यांच्या मुलाला बीसीसीआयचे सचिव बनवले आहे त्यामुळे सगळेच अमित शाहांसारखे नसतात” असा टोलाही त्यांनी लगावला आहे.