Just another WordPress site

रक्षाताई खडसे यांच्या प्रचाराकरीता एकनाथराव खडसे मैदानात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२ मे २४ गुरुवार

भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेले माजी मंत्री व जेष्ठ आमदार एकनाथराव खडसे यांनी वरिष्ठांचे सूचनेनुसार रावेर लोकसभेच्या भाजपा महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांचे प्रचारास सुरुवात केली आहे.काल दि.१ मे मंगळवार रोजी त्यांनी यावल येथील भाजपा प्रचार कार्यालयास भेट देत कार्यकर्त्यांना सूचना देत आढावा घेतला.दरम्यान भाजपामध्ये प्रवेश करीत असल्याचे आमदार एकनाथराव खडसे यांनी जाहीर केल्यानंतर अद्याप पावतो प्रचारात सक्रिय झाले नव्हते मात्र दोन दिवसापासून प्रचारात सक्रिय झाल्याची त्यांनी यावल येथे पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

याप्रसंगी त्यांनी सांगितले वरिष्ठांकडे मी माझ्या भाजप प्रवेशाबाबत सूचित केले होते व त्यानुसार भाजपाचे वरिष्ठ नेते विनोद तावडे तसेच भाजपाचे प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना माझा प्रवेश कधी जाहीर करणार असे त्यांना विचारले असता त्यांनी प्रवेशाची तारीख कळवणार असल्याचे सांगून तुमचा प्रवेश झालेलाच आहे बैठका घेण्यास व प्रवास करण्यास हरकत नसल्याचे सांगितले.त्यानुसार मी गेल्या दोन दिवसापासून प्रचारात सक्रिय झालो असून यावल हे माझे प्रचारार्थ आठवे गाव असल्याचे त्यांनी सांगितले.आगामी रावेर लोकसभा निवडणूक मतदार संघ अंतर्गत भाजपा उमेदवारास किती लीड मिळेल ? यापेक्षा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह किती आहे व मतदारांचे मतदानाचे प्रमाण यावर लीड अवलंबून असेल.तरीही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वरील विश्वास व कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता रक्षाताई खडसे या प्रचंड बहुमताने निवडून येतील असे एकनाथराव खडसे यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.