Just another WordPress site

आदिवासी बांधवांना मूलभूत सुविधा देण्यात याव्या या मागणीकरिता निळे निशाण संघटनेतर्फे आंदोलन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यात वाड्या वस्तींवर वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांना मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याने तसेच प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही या मूलभूत सुविधा पुरविल्या जात नसल्याने निळे निशाण संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच येथील पंचायत समिती कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले.परंतु  पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

तालुक्यातील विविध गावांमध्ये अनु .जाती/जमातीचे लोक गेली कित्येक वर्षपासून अतिदुर्गम क्षेत्रात वास्तव्यास आहेत.परंतु आजपावेतो त्यांना  शासनाकडून मिळत असलेल्या सुख-सुविधांपासून तसेच जिवनावश्यक मुलभूत गरजांपासून वंचित राहावे लागत आहे .यासंदर्भात प्रशासनाला वारंवार समस्यांचे लेखी स्वरूपात निवेदन देऊन ही समस्यांचे समाधानकारक निवारण होत नसल्याने याकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता दि.०७ ऑक्टोबर रोजी लोकशाही मार्गाने पंचायत समिती कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले.सुमारे दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे यावल शहराच्या प्रमुख मार्गावरीत वाहतुक विस्कळीत झाली होती.यावेळी संघटनेच्या वतीने निवेदनात चारमळी,टेंभीगुरन आसराबारी पाडा,सांगवी बुद्रुक या गावांच्या समस्यांचा समावेश होता.यात पिण्याचे पाण्याची व्यवस्था,गावाअंतर्गत रस्ते व स्ट्रीट लाईट  व्यवस्था,आदीवासी पाडयांवरील शाळा सुरळीत चालू ठेवणे,चारमळी येथे अंगणवाडीची मागणी तसेच अनियमित शिक्षकांवर कारवाई करणे अशा विविध मागण्यांचा समावेश करण्यात आला होता.या आंदोलकांना गटविकास अधिकारी एकनाथ शिंदे यांच्या वतीने कक्ष अधिकारी जी. एम.रिंधे यांनी शिक्षण विस्तार अधिकारी विश्वनाथ धनके यांच्या उपस्थितीत समस्या सोडविण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर संघटनेचे आंदोलन मागे घेण्यात आले .याप्रसंगी अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या सह संघटनेचे पदाधीकारी सदाशिव निकम,नंदा बाविस्कर,युवराज सोनवणे,अशोक तायडे,लक्ष्मी मेढे,तालुका युवक अध्यक्ष विलास तायडे,ज्योती कुरकुरे,सैय्यद सखावत,दिपक मेढे,राहुल तायडे,जितेंद्र मेढे,सिकाऱ्या पावरा,मिलिंद सोनवणे, सुनिल बारेला,देविदास बारेला,दिपक मेढे,नितिन कोलते यांचेसहसंघटना पदाधिकारी,कार्यकर्ते व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.