यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३ मे २४ शुक्रवार
तालुक्यातील पिंपरूड येथील एका अविवाहित तरूणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या करून आपली जिवनयात्रा संपविल्याची घटना नुकतीच आहे.सदर घटनेची फैजपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,दिनेश शांताराम सरवाडे वय २५ वर्ष राहणार डॉ.आंबेडकर नगर पिंपरूड तालुका यावल या अविवाहीत तरुणाने काल दि.२ मे २०२४ रोजी सकाळी ८ वाजेच्यापुर्वी आपल्या राहत्या घरातील छताच्या ऍगलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या करीत आपली जिवनयात्रा संपवली आहे.याबाबत मयत दिनेश सुरवाडेचा लहान भाऊ चेतन शांताराम सुरवाडे वय २० वर्ष यांनी खबर दिल्याने फैजपुर पोलीस ठाण्यात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.दरम्यान या तरूणाने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही.मयत दिनेश सुरवाडे याच्या मृतदेहाचे यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असुन या घटनेचा तपास फैजपुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रशीद तडवी हे करीत आहे.