Just another WordPress site

सुषमा अंधारेंना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश,सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरुप

रायगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.३ मे २४ शुक्रवार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाले असून सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरुप आहेत.हेलिकॉप्टर का क्रॅश झाले त्याची माहिती समोर आलेली नाही.महाड या ठिकाणी ही घटना घडली आहे.मी प्रचासभेसाठी जायचे होते म्हणून थांबले होते.दोन ते तीन सभा करायच्या होत्या आणि मंडणगड तसेच रोहा या ठिकाणी जायचे होते त्याआधीच ही घटना घडली आहे.महाडची सभा करुन मुक्कामाला थांबले होते.हेलिपॅडजवळ आम्ही होतो.चॉपर येणार होते.चॉपरने ते दोन ते तीन घिरट्या घातल्या आणि अचानक मोठा आवाज झाला तसेच धुळीचे लोट उठले.सुरुवातीला नीट काही समजले नाही.पण आजूबाजूचे सगळे लोक सांगत होते की पुढे जाऊ नका.मला कॅप्टनची चिंता होती की ते सुखरुप आहेत की नाही ? मात्र कॅप्टन सुखरुप आहेत.मी आणि माझा लहान भाऊ आम्ही दोघे प्रवास करणार होतो पण आम्ही सगळे सुखरुप आहोत.प्रवास सुरु करण्याआधीच ही घटना घडली असे सुषमा अंधारेंनी सांगितले आहे.

सुषमा अंधारे या पेशाने एक वकील आहेत.राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र विषयाच्या व्याख्यात्या,पुरोगामी तसेच स्त्रीवादी अभ्यासक,भटक्या विमुक्त व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या,वक्त्या आणि लेखिका आहेत.शिवसेना ठाकरे गटाच्या २०२२ च्या दसरा मेळाव्यानंतर त्या चर्चेत आल्या.या मेळाव्यात त्यांनी आक्रमक शैलीत भाषण केले होते.सध्या त्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या स्टार प्रचारक आहेत व त्यांच्या खास भाषण शैलीसाठी त्या ओळखल्या जातात.

Leave A Reply

Your email address will not be published.