यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.६ मे २४ सोमवार
तालुक्यातील किनगाव येथील एका किराणा दुकानातुन विनापरवाना प्रतिबंधीत असलेला सुगंधीत पानमसाला आणी गुटका असा एकुण २ लाख ५१ हजार रूपयांच्या मुद्देमालावर फैजपुर विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपुर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की,तालुक्यातील किनगाव येथील गावातील मध्यवस्तीत असलेल्या अनिल किराणा दुकानात अवैधरित्या सुगंधीत पानमसाला आणी न्यायलयाने प्रतिबंधीत केलेल्या व मानवी जिवनास अपायकारक असलेला गुटका हा मोठया प्रमाणावर विक्री होत असल्याची गोपानिय माहिती फैजपुर विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपुर्णा सिंग यांना मिळाली असता त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या पथकाने किनगाव येथील जगन्नाथ विठ्ठल पाटील वय ५१ वर्ष राहणार पाटीलवाडा यांच्या अनिल किराणा दुकानात छापा टाकला असता सुमारे २ लाख ५१ हजार रूपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधी पानमसाला व गुटका दुकानातुन आढळून आला.याप्रकरणी पोलीस नाईक अल्ताफ अली हसन अली यांनी दिलेल्या फिर्यादी वरून किराणा दुकानदार जगन्नाथ पाटील यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास उपनिभागीय पोलिस अधिकारी अन्नपुर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक हरिष भोये व पोलीस करीत आहेत.