उदय सामंत म्हणाले,यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट नाही परंतु नरेंद्र मोदी यांचे वलय अद्याप संपलेले नाही. देशातील तरुण आणि महिला रांगा लावून मोदींना आणि एनडीएला मतदान करत आहेत.निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा चालतो आहे. विरोधक दावा करतायत की,मुस्लिम समाज भाजपावर,आमच्यावर नाराज आहे मात्र तीन तलाक बंदीमुळे मुस्लिम महिला भारतीय जनता पार्टीला मतदान करत आहेत.आरक्षण आणि कुणबी दाखले दिल्यामुळे राज्यातला मराठा समाज खूष आहे हे करत असतांना इतर मागासवर्गाच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावलेला नाही त्यामुळे ओबीसी समाज आमच्यापासून दुरावला यात काहीच तथ्य नाही.यासह जातीपातीच्या आधारे मतदारांचे ध्रुवीकरण करण्यात विरोधकांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही.४०० पारचा जो भाजपाचा नारा होता त्याचा संदर्भ देऊन राज्यघटना बदलवण्याची भीती काँग्रेसकडून मतदारांना दाखवली जात आहे.काँग्रेसच्या या अपप्रचाराचा फटका महायुतीला काही प्रमाणात बसतो आहे याला काँग्रेस जबाबदार आहे.खोटे बोल पण रेटून बोल ही काँग्रेसची आजपर्यंतची परंपराच आहे.दरम्यान उदय सामंत यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती किती जागा जिंकेल याबाबतही अंदाज व्यक्त केला.सामंत म्हणाले,लोकसभेत राज्यात महायुती नक्कीच ४० पेक्षा अधिक जागा जिंकेल.४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.पहिल्या दोन टप्प्यांमध्ये झालेल्या मतदानात महायुतीला अनुकूल असेच मतदान झाले आहे.विरोधकांकडे कोणताही कार्यक्रम नाही यामुळेच जातीय आधारावर टीकाटिप्पणी विरोधकांकडून केली जात आहे त्याचा त्यांना काहीच फायदा होणार नाही असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.