“भेंडवळची घटमांडणी व भाकीत अवैज्ञानिक असून राजकीय भाकीत केल्यास निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार !!” – अंधश्रद्धा निर्मुलन समितीचा इशारा
भेंडवळची घटमांडणी आज दि.१० मे शुक्रवार रोजी संध्याकाळी करण्यात येणार असून यावरची विविध भाकिते उद्या दि.११ मे शनिवार रोजी करण्यात येणार आहेत.या घटमांडणीच्या अंदाजावर शेतकऱ्यांचा मोठा विश्वास असतो आणि त्यानुसार वर्षभराचे नियोजन शेतकरी करत असतात परंतु अ.भा.अनिसंचे जिल्हा संघटक अभयसिंह मारोडे यांनी आज माध्यमाशी बोलतांना म्हटले आहे की,ही घटमांडणी थोतांड व अवैज्ञानिक आहे.शेतकऱ्यांनी या मांडणीच्या भाकितांवर विश्वास ठेवू नये.या घटमांडणीत राजकीय भाकीतसुद्धा केली जातात.यावर्षी देशभरात लोकसभा निवडणुका होत असून सर्वत्र आचारसंहिता लागू आहे त्यामुळे जर राजकीय भाकीत किंवा अंदाज व्यक्त केला गेला तर आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशाराही अभयसिंह मारोडे यांनी दिला आहे.
बुलढाणा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१० मे २४ शुक्रवार
भेंडवळ येथे करण्यात येणारी घट मांडणी व अन्य भाकिते अवैज्ञानिक आहेत तसेच उद्या राजकीय भाकीत केल्यास थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिला आहे.