जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले,ज्या विचारधारेसाठी शरद पवार यांनी स्वतःचे घर तुटताना पाहिले त्यांना यायचे असते तर कधीच आले असते. त्यांना अजित पवारांची काय गरज ? ते थेट तुमच्याकडे आले असते.मात्र मोदींनी केलेले हे वक्तव्य लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी आणि पक्षा पक्षांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी केले आहे.तुम्ही एका जेष्ठ नेत्यांचा सन्मान कसा करता हे संपूर्ण भारताने पाहिले आहे.या पक्षाचे मालक शरद पवार आहेत.जो पक्ष यांनी चोरून आणि पळवून नेला आहे असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.४० ते ५० वर्षांपासून महाराष्ट्राचे एक मोठे नेते राजकारणात आहेत.ते काहीही भाष्य करत आहेत.बारामतीच्या निवडणुकीनंतर ते चिंतेत असावेत त्यांनी काही लोकांबरोबर काही विचार विनिमय करून ते विधान केले असावे.छोटे छोटे प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन व्हायला पाहिजे असे शरद पवार यांनी विधान केले होते.त्यांच्या विधानाचा अर्थ असा होतो की,नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना पक्षाने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे मन तयार केले आहे.४ जूननंतर काँग्रेसबरोबर जाण्यापेक्षा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर या सर्व स्पप्न पूर्ण होतील असे मोदी यांनी म्हटले होते.