जेजुरी तीर्थक्षेत्र असल्याने गेल्या वर्षी पर्यटकांसाठी पॅरामोटरिंग सेंटर उभारण्यात आले आहे.पॅरामोटरमध्ये बसून जमिनीपासून १२०० फुटावरून जयाद्री पर्वतावर असलेले खंडोबा मंदिर,कडेपठार मंदिर व निसर्गरम्य परिसर पाहण्याचा आनंद भाविक व पर्यटक घेतात.कडेपठारच्या डोंगर रस्त्यावरील एका मैदानात हे पॅरामोटरिंग सेंटर सुरू वातावरणातील अनुकूलता बघूनच पर्यटकांना रायडिंगसाठी नेण्यात येते.प्यारा मोटरमध्ये पायलट व एक प्रवासी एकावेळी बसू शकतो.जेजुरी पोलिसांनी अपघाताची नोंद दाखल केली आहे.पुणे येथील प्रदिप माने हे आपल्या परिवारासह जेजुरी येथे खंडोबाच्या दर्शनासाठी आले होते.पाच महिन्यापुर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी या पॅरामोटरमध्ये बसून पर्यटनाचा आनंद घेतला होता.ही बातमी वृत्तपत्रामध्ये अस्था माने हीने वाचली होती त्यामुळे आवर्जुन ती पॅरामोटरींगची सफर करण्यासाठी आली होती पण दुर्दैवाने हा अपघात घडला.काल खंडोबाचा रविवार असल्याने जेजुरीत एक लाखाच्यावर भाविक आले होते.अपघात झालेल्या जागेजवळच असलेल्या चिंचेच्या बाग परिसरामध्ये हजारो भाविक देवकार्य करण्यासाठी थांबले होते.पॅरामोटर कोसळलेल्या ठिकाणापासून पन्नास फूटावर रस्ता असून या रस्त्यावर खूप गर्दी होती.सुदैवाने पॅरामोटर वाड्यात पडल्याने मोठी जीवीत हानी टळली.हा अपघात झाल्यानंतर या परिसरात घबराट पसरली.चंद्रकांत महाडिक (पायलट) नेहमी प्रमाणे आज प्रवासी घेऊन उड्डाण केले.कमी उंचीवरुन पॅरामोटर नेत असतांना अचानक मशिनचा बोल्ट तुटून तो पंख्याला लागला.पंख्याचे पाते उडाल्याने बलुनची नायलॉन दोरी तुटली त्यामुळे पॅरामोटर खाली आले.याठिकाणी रस्त्यावर भाविकांची खुप गर्दी होती त्यामुळे बाजूच्या वाड्यात पॅरामोटर नेले.उंची कमी असल्याने खालचे बलुन उघडता आले नाही.