यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१६ मे २४ गुरुवार
तालुक्यातील साकळी प्राथमिक केंद्राअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र असलेल्या थोरगव्हाण,पिळोदा खुर्द येथील गावांमध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजु तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली साकळी गावाचे प्राथमिक केन्द्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वाती कवडीवाले,तालुका हिवताप पर्यक्षवेक्षक विजय नेमाडे,आरोग्य निरिक्षक अरुण चौधरी व नितीन वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली डेंग्यु दिवस साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने तालुक्यातील साकळी प्राथमिक केंद्राअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र असलेल्या थोरगव्हाण,पिळोदा खुर्द येथील गावांमध्ये मलेरिया व डेंग्यू किटकजन्य आजाराविषयी माहिती देवून तसेच जनतेला आरोग्य शिक्षण देवून जनजागृती करण्यात आली.यावेळी आरोग्य सेवक मकरंद निकुंभ यांनी डेंग्यु आजाराबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती सांगितली.या कार्यक्रमाला पिळोदा खुर्दचे सरपंच श्रीमती सरला विनोद पाटील, पोलीस पाटील श्रीमती अर्चना दीपक पाटील व ग्रामपंचायत संगणक संचालक दिगंबर पाटील यांचे देखील या जनजागृतीसाठी घेण्यात आलेल्या कार्यक्रमास सहकार्य लाभले.या कार्यक्रमाला आशा स्वयंसेविका श्रीमती अनिता पाटील,अंगणवाडी सेविका श्रीमती बेबुबाई पाटील व ग्रामस्थ हजर होते.