Just another WordPress site

किनगाव परिसरात राष्ट्रीय डेंग्यु दिवसानिमित्ताने जनजगृती

यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :-

दि.१८ मे २४ शनिवार

तालुक्यातील किनगाव आरोग्य विभागाच्या वतीने विविध ठीकाणी राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त आरोग्याविषयी जनजागृती मोहीम राबवुन साजरा करण्यात आला.

यानिमित्ताने आरोग्य विभागाचे जन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.तुषार देशमुख व यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजू तडवी यांच्या सुचनेनुसार वैद्यकीय अधिकारी डॉ.तरन्नुम शेख,डॉ.दर्शना निकम व तालुका आरोग्य पर्यवेक्षक विजय नेमाडे यांच्या मार्गदर्शनाने प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र आडगांव,मालोद,किनगाव,डांभुर्णी,नायगाव व चिंचोली येथे राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेमध्ये गावात डेंग्यूताप रुग्ण सर्वेक्षण,कंटेनर सर्वेक्षण,हस्त पत्रिका वाटप करण्यात आले तसेच गाव पातळीवर डेंग्यूतापाची लक्षणे,उपचार व डेंग्यूताप प्रतिरोध उपाययोजनांबद्दल नागरिकांना माहीती देण्यात आली. नागरिकांनी आपापल्या घरातील पाणीसाठे झाकून ठेवणे,घरासमोरील नाल्या वाहत्या करणे,खिडक्यांना जाळ्या बसवणे, शौचालयाच्या व्हेण्ट पाईपला जाळी बसवणे,घरासमोर पाणी साचू न देणे,आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळणे अशा सूचना यावेळी नागरिकांना देण्यात आल्या या मोहिमेत आरोग्य सेवक पवन काळे (पाटील),मनोज बारेला,प्रयोगशाळा वैज्ञानिक सतीश सोनवणे यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव येथील सर्व कर्मचारी व आशा वर्कर यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.