Just another WordPress site

यावल,चोपडा व रावेर वनक्षेत्राअंतर्गत बुद्ध पौर्णीमेला जंगलातील प्राण्यांचे दर्शनासाठी ४३ मचानांची उभारणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१९ मे २४ रविवार

तालुक्यातील सातपुडा वनक्षेत्रात वनविभागाकडून बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वनातील करण्यात येत असलेल्या प्राणी गणनेसाठी यावल वनविभागाने पूर्वतयारी म्हणून मचान उभारणेसह आवश्यक तयारी पूर्ण केली असून यावल वन विभागात एकूण ४३ मचान उभारल्याची माहिती यावल वनविभागाचे सह वन संरक्षक प्रथमेश हाडपे यांनी दिली आहे.दरम्यान यावल वनविभाग अंतर्गत असलेल्या चोपडा वनक्षेत्र ३,वैजापूर वनक्षेत्र ७,अडावद वनक्षेत्र ४,देवगिरी क्षेत्रात ४,यावल पूर्व वनविभाग ७,यावल पश्चिम वनविभाग ६ व रावेर वनक्षेत्र १२ असे एकूण ४३ मचान उभारण्यात आले असल्याचे वनविभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

बौद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या शीतल व लख्खप्रकाशात जंगलातील प्राण्यांचे विविध थरार अनुभवण्याची संधी यावर्षीही जंगल सफारींना अनुभवता येईल.यात एका मचानवर पाच ते सहा व्यक्ती बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.जंगलातील असलेल्या पानवट्यावर प्राणी पाणी पिण्यासाठी येत असतांना तसेच जंगलात भटकंती करत असतांना प्राण्यांची गणना केली जाते.काही ठिकाणी ट्रॅप कॅमेराद्वारे सुद्धा गणना केली जाते.नवखे निसर्ग प्रेमी,निसर्ग अभ्यासक व विद्यार्थी यांनाही जंगलातील थरार अनुभवता येईल.यावल वन विभागात अस्वल,बिबट, सांबर,वाघ,चितळ,रेडकी,चौशिंगा,सायळ यासह विविध पक्षी,सरपटणारे प्राणी व तसेच दुर्मिळ प्राणी सुद्धा नजरेस पडतात.सदर कार्यक्रमाचे नियोजनवनविभागातील प्राणी गणना ही धुळे प्रादेशिक वन विभागाच्या वनसंरक्षक निनू सोमराज,यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर. एम.शेख,सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांचे मार्गदर्शनाखाली सर्व वनविभागाचे यावल वनपरिक्षेत्राचे अधिकारी स्वप्नील फटांगरे,पश्चिम क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल भिलावे,रावेर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे,चोपडा वनक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल,वनरक्षक व वनमजूर काम करणार आहेत अशी माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.