Just another WordPress site

यावल पोलीसांच्या कारवाईत विमल गुटख्यासह दिड लाखाचा ऐवज जप्त

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२१ मे २४ मंगळवार

येथील पोलीसांनी गुप्त माहीतीच्या आधारावर मानवी आरोग्यास अत्यंत धोकादायक असलेला विमल गुटखा व पान मसाल्याची चोरटी वाहतूक होत असल्याचे माहितीच्या आधारावर केलेल्या कारवाईत वाहनासह सुमारे दिड लाखाचा मुद्देमाल जप्त केला असून या गुन्ह्यात तिन जणांना अटक करण्यात आलेली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,तालुक्यातील साकळी येथील यावल-किनगाव रस्त्यावरील नावेर गावाजवळील भोनक नदीच्या पुलावर दि.१९ मे रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास यावल पोलीसांनी गुप्त माहीती मिळाल्याच्या आधारावर रिक्शा क्रमांक एम एच १९ सि डब्ल्यु ३५४९ या वाहनाची झाडाझळती घेतली असता सदरच्या वाहनात साकळी येथील शेख रफिक शेख मुनाफ यांच्या किराणा दुकानासाठी यावल येथील प्रमोद जगन्नाथ बुरूजवाले ही व्याक्ती न्यायालयाने प्रतिबंधित केलेला व मानवी आरोग्यास अत्यंत धोकादायक असलेला सुमारे ५० हजार रूपये किमतीचा केसर युक्त विमल गुटका आणि ९० हजार रुपये किमतीची रिक्शातुन चोरटी वाहतुक करतांना आढळुन आला.सदरहू पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक मुजफ्फर खान व पोहेकॉ सिकंदर तडवी यांनी केलेल्या कारवाई मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याबाबत साकळी दुरक्षेत्र पोलीस चौकीस नेमणुकीत असलेले पोलीस कॉस्टेबल अल्लाऊद्दीन मुबारक तडवी यांनी फिर्याद दिल्याने यावल पोलीस ठाण्यात प्रमोद जगन्नाथ बुरूजवाले,शेख रफीक शेख मुनाफ,संदीप उर्फ बापु सोपान धनगर यांच्या विरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन यातील संशयीत आरोपी प्रमोद जगन्नाथ बुरुजवाले,शेख रफीक शेख मुनाफ व संदीप सोपान धनगर या तिघांना अटक करण्यात आली आहे.दरम्यान या तिघा संशयीतांना न्यायालयाने २२ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.