मुक्ताईनगर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
पावणे ती लाखांचा मुद्देमाल जप्त;गौरवास्पद कामगिरीचे सर्व थरातून कौतुक
योगेश पाटील
रावेर-पोलीस नायक(प्रतिनिधी):- मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगाव,उचंदा आणि मेडसावंगे या भागात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धडक कारवाई करीत पावणे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेले असून यात मिळून आलेले गावठी दारू भट्टीचे रसायन जागेवरच नष्ट करण्यात आलेले आहे.सदरील कारवाई शनिवार रोजी करण्यात आली.हि करवाई करतांना राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी खाजगी बोटीने प्रवास करून हि अफलातून कारवाई केली.त्यांच्या या धडक व स्तुत्य कामगिरीचे जिल्हाभरातून कौतुक केले जात आहे.अशाच प्रकारची कारवाई संपूर्ण जिल्हाभरात राबविण्यात यावी अशी आग्रही मागणी गावस्तरावरून व महिला वर्गाकडून केली जात आहे.
याबाबत अधिक वृत्त असे कि,राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना पूर्णा नदी पात्रातील मानेगाव उचंदा आणि मेळसांगवे शिवारातील बेटांवर गावठी हातभट्टीची दारू बनविली जात असल्याबाबत गुप्त माहितीच्या आधारावर अधिकाऱ्यांनी सापडा रचून सरकारी वाहनाचा वापर न करता खाजगी बोटीने प्रवास करून हि मोठी कारवाई केली हे विशेष !त्यांच्या या कामगिरीचे सर्व थरातून कौतुक केले जात आहे.सदरील कारवाई शनिवार दि.८ रोजी विभागीय निरीक्षक सुजित कपाटे राज्य उत्पादन शुल्क भुसावळ यांच्या पथकाने मुक्ताईनगर तालुक्यातील श्रीक्षेत्र चांगदेव येथून खाजगी बोटीने पूर्णा नदी पात्रातील मानेगाव उचंदा आणि मेळसांगवे शिवारातील बेटांवर छापे टाकून ११९६० लिटर गावठी हातभट्टी निर्मितीसाठी लागणारे रसायन व इतर साहित्य असा एकूण २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच गावठी दारू निर्मिती करिता लागणारे रसायन जागीच नाश करण्यात आले.यावेळी आरोपींनी पळ काढल्यामुळे घटनास्थळी कोणताही आरोपी मिळून आला नाही मात्र आरोपीचा शोध घेणे सुरू असून आरोपींवर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन विभागीय निरीक्षक सुजित कपाटे राज्य उत्पादन शुल्क भुसावळ यांनी दिले आहे.सदरील कारवाई विभागीय निरीक्षक सुजित कपाटे राज्य उत्पादन शुल्क भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर साहेब,राजेश सोनार,दुय्यम निरीक्षक अमोल भडांगे तसेच दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सीमा तपासणी नाका पूर्णाड व विभागीय निरीक्षक पथकाचे वाहनचालक सागर देशमुख,गोकुळ अहिरे सहा दुय्यम निरीक्षक मधुकर वाघ,नितीन पाटील,योगेश राठोड,अमोल पाटील,भूषण परदेशी,नंदू ननवरे,विजय परदेशी तसेच पोलीस कर्मचारी गुन्हे अन्वेषण शाखा जळगाव यांनी यशस्वीरित्या पार पाडली.सदरील गुन्ह्याचा तपास निरीक्षक सुजित कपाटे व दुय्यम निरीक्षक राजेश सोनार आणि दुय्यम निरीक्षक अमोल भडांगे हे करीत आहेत.