यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ मे २४ बुधवार
सन २३-२४ या वर्षातील फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या एच.एस.सी परीक्षेमध्ये कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा ९३.३८ टक्के व कला शाखेचा ७२ टक्के तसेच किमान कौशल्य विभागाचा ८५ टक्के निकाल लागला आहे.
यात विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कु.तडवी सानिया राजू हिने ७९.८३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक तर कु.चौधरी मनस्वी गणेश हिने ७९.३३ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक आणि कु.जाधव यामिनी शिवाजी या विद्यार्थिनीने ७७.८३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. तसेच कला शाखेतून कु.पंडीत श्रद्धा राजू या विद्यार्थिनीने ७०.५० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक तर कु.जगताप सीमा अर्जुन हिने ६५.३३ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक आणि कु.पाटील माधुरी योगेश हिने ६३.८३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला तर किमान कौशल्य विभागात कु.बारी दिपीका विजय या विद्यार्थिनीने ७१.१७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला तर कु.पाटील रेणुका समाधान ६६.६७ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला तर कु.पाटील वैशाली मंगलसिंग ६४.३३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. सदरील विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थाचालक,प्राचार्या संध्या सोनवणे,उपप्राचार्य संजय पाटील,प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या यशामध्ये सहकार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांचे सुद्धा अभिनंदन केले आहे.