इथेन हा नैसर्गिक वायूचा एक प्रकार असून त्याच्यापासून इथिलिन तयार करण्यात येते.प्लास्टिक,सिंथेटीक रबर आणि इतर पेट्रोकेमिकल्स तयार केले जातात.सध्या भारतात रिलायन्स इंडस्ट्रीजचे दोन इथेन क्रॅकिंग प्रकल्प आहेत.एक प्रकल्प गुजरातच्या हाजिरा येथे तर दुसरा महाराष्ट्रातील नागोठणे येथे आहे.गेलकडून सध्या मध्यप्रदेशमध्ये थाटला जाणार प्रकल्प महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर किंवा दाभोळ येथे होणार होता मात्र नंतर हा प्रकल्प मध्यप्रदेशमध्ये थाटण्याचा निर्णय झाला आहे.भारत पेट्रोलियम कॉर्पचाही ६ अब्ज डॉलरचा इथेन-फेड क्रॅकर प्रकल्प मध्य प्रदेशच्या बिना रिफायनरी येथे हलविण्यात आला आहे.इथेन अधिक असलेल्या देशांमधून आपल्याकडे आयात केले जाईल असे गेलने फेब्रुवारी महिन्यात जाहीर केले होते.मार्च महिन्यात गेलने ओएनजीसी आणि शेल एनर्जी इंडिया यांच्याबरोबर इथेन व इतर हायड्रोकार्बन्स आयात करण्यासाठी सामंजस्य करार केला.सुरुवातीला हा प्रकल्प महाराष्ट्रात होण्याची चर्चा असतांनाच आता अचानक हा प्रकल्प मध्यप्रदेश मध्ये गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.सदर बाबीबाबत विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली जात आहे.