पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२८ मे २४ मंगळवार
चिंचवडमध्ये प्रेम प्रकरणातून एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला चार चाकी गाडीने उडवल्याची घटना उघडकीस आली आहे.या घटनेमध्ये निलेश शिंदे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सुशील भास्कर काळे या आरोपीला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना मध्यरात्री एकच्या सुमारास टेल्को रोड यशवंत नगर या ठिकाणी घडलेली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी सुशील भास्कर काळे आणि जखमी निलेश शिंदे या दोघांचे एकाच युवतीवर प्रेम आहे.परंतु प्रेयसी ही सुशील भास्कर काळे याच्यावर प्रेम करते तर निलेश शिंदे हा आधी त्या युवतीचा प्रियकर होता.निलेश शिंदे हा युवतीला त्रास देत असल्याचे युवतीचे म्हणणे आहे.मध्यरात्री निलेश शिंदे हा एक्स गर्लफ्रेंड (प्रेयसीला) दुचाकी घेऊन भेटायला आला याची कल्पना त्या युवतीने आरोपी सुशील भास्कर काळे याला दिली होती.जेव्हा टेल्को रोड या ठिकाणी रस्त्यावर निलेश शिंदे आणि सुशील भास्कर याची प्रेयसी बोलत थांबले तेव्हा सुशील भास्कर याने भरधाव वेगातील चार चाकी गाडी निलेश शिंदेच्या अंगावर घातली व या घटनेत तो गंभीर जखमी झाला.तातडीने त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यात आले.याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपी सुशील भास्कर काळे याला अटक केली आहे.जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर त्या युवतीची पिंपरी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.हा सर्व प्रकार प्रेमाच्या त्रिकोणातून घडल्याचे समोर आलेले आहे.