दरम्यान राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून त्यांनी म्हटले आहे की मनुस्मृती ग्रंथावर लोकांचा आक्षेप असला तरी ज्या श्लोकाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा विचार केला जात आहे तो श्लोक अतिशय चांगला आहे.दीपक केसरकर म्हणाले मनुस्मृतीमधील तो श्लोक आक्षेपार्ह नाही.तो श्लोक अतिशय चांगला आहे.त्या ग्रंथातील अनेक भागांवर लोकांचे आक्षेप आहेत. सर्वसाधारणपणे त्यातील काही ठराविक भागांवर आक्षेप असून आमचे त्याबद्दल काहीच म्हणणे नाही व आम्ही त्याचे समर्थन किंवा प्रचार करत नाही.मनुस्मृतीतील आक्षेपार्ह मजकुराचा आम्ही प्रचार करत नाही मात्र ज्या श्लोकाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा प्रस्ताव आहे त्या श्लोकात एकही चूक नाही त्यावर आक्षेप घेणाऱ्यांनी या श्लोकातील एक तरी चूक दाखवावी.राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमात तो श्लोक शिकवला जात असून सीबीएसई बोर्ड मध्ये तो श्लोक शिकवत आहेत असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली असून आम्ही या सरकारमध्ये असेपर्यंत असे काही होऊ देणार नाही असे अजित पवार यांनी म्हटले आहे.तुम्ही (जनतेने) या गोष्टीची काळजी करू नका.आम्ही जी विचारधारा घेऊन पुढे चाललो आहोत त्या विचारधारेला कुठेही धक्का लागला तर आम्हाला ते चालणार नाही व त्यासाठी कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मागे हटणार नाही असे अजित पवार यांनी म्हटले आहे.