जगभरात जर मार्टीन ल्यूथर किंग आणि नेन्सन मंडेला यांना ओळखले जाते मात्र गांधी त्यांच्यापेक्षा कमी नव्हते.मी संपूर्ण जग फिरलो आहे मात्र गांधींना किंवा गांधींच्या माध्यमातून भारताला जी ओळख मिळायला हवी होती ती मिळाली नाही.आज जगभरातील अनेक समस्यांचे समाधान गांधींच्या विचारात आहे.आपण खूप काही गमावले आहे असेही ते म्हणाले.ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिरासंदर्भातील निर्णय दिला त्यानंतर देशात कुठेही हिंसाचाराची घटना घडली नाही सर्वत्र शांतीचे वातावरण होते व ही शांती एकतर्फी नव्हती याचे श्रेय सर्वांनाच जाते.राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला तेव्हा बाबरी मशिदीची लढाई लढणारे इक्बाल अन्सारी तिथे उपस्थित होते हा आपला भारत आहे मात्र आपण त्याचे मार्केटींग करत नाही असेही त्यांनी सांगितले आहे.