जे दोन श्लोक राज्य सरकार अभ्यासक्रमात समाविष्ट करु पाहात आहेत ते दोन्ही श्लोक आव्हाड यांनी यावेळी वाचून दाखवले तसेच मनुस्मृतीमधील इतरही काही आक्षेपार्ह श्लोक वाचून दाखवले आणि त्यांचा अर्थ सांगितला.त्यानंतर आव्हाड म्हणाले,मनुस्मृतीत क्षुद्र आणि स्त्रियांबाबत खूप घाणेरडे लिखाण केलेले आहे.स्त्रिया मानवजातीत मोडत नाहीत असे मनूचे म्हणणे आहे.स्त्रिया या केवळ उपभोग घेण्यासाठी असतात असे मनू मानतो त्यामुळे स्त्रियांचा उपभोग घ्या आणि त्यांना सोडून द्या असेही मनू सांगतो.मनुस्मृतीमधील दोन श्लोक अभ्यासक्रमात घेतले तर हळूहळू संपूर्ण ग्रंथाचा अभ्यासक्रमात समावेश केला जाऊ शकतो.जितेंद्र आव्हाड म्हणाले,काही निवडक लोक आपल्या महाराष्ट्राला बदनाम करू पाहतायत.आपल्या राज्याला पुन्हा ४ ते ५ हजार वर्षे मागे नेण्याचे काम करतायत.देशातले सरकार आपले संविधान बदलण्याचे काम करत आहेत,समाजांमध्ये तेढ निर्माण केली जात आहे,राजकीय फायद्यांसाठी जातीय आणि धार्मिक द्वेष पसरवण्याचे काम चालू आहे त्यामुळे आपल्यासमोर आणि आपल्या देशाची चिंता असलेल्या लोकांसमोर एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.