Just another WordPress site

“राजकीय वैमनस्यातून माजी नगरसेवकासह मित्रावर गोळ्या झाडून हत्या !! भुसावळ शहर पुन्हा एकदा दुहेरी खुनाने हादरले !!

भुसावळ-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.३० मे २४ गुरुवार

शहरातील माजी नगरसेवक संतोष बारसेंसह त्यांच्या मित्रावर अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.सदर घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे.पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत सदर प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.या खुनाच्या घटनेमुळे भुसावळ शहर पुन्हा एकदा दुहेरी खुनाने हादरले आहे.

भुसावळ महामार्गावरील जुन्या रस्त्यावरील मरीमाता मंदिरानजीकच्या पुलाजवळ बुधवारी रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.जुन्या राजकीय वैमनस्यातून हा खून झाला असल्याचा संशय असून शहर पोलिसांची आता चांगलीच झोप उडाली आहे.माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे हे दोघे जुना सातारा परिसरात रात्री कारमध्ये बसलेले असतांना दोघांवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हल्ला केली.सदरील हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून त्यांना भुसावळ शहरातील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले होते मात्र तिथे डॉक्टरांकडून त्यांना मयत घोषित करण्यात आले.घटनेची माहिती मिळताच सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी अणि कर्मचारी आता कामाला लागले आहेत.भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघन आणि त्यांचे सहकारी फरार संशयित आरोपींविषयी माहिती गोळा करीत आहेत तर या दोघांचे शव जळगाव शासकीय महाविद्यालय येथे शवच्छेदनासाठी नेण्यात आले.दरम्यान खुनाच्या या घटनेमुळे भुसावळ पुन्हा एकदा हादरले आहे.जिल्ह्यात वारंवार होणाऱ्या खुनाच्या घटना आता हळूहळू डोके वर काढू लागल्या आहेत यामुळे सामान्य नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले आहे मात्र अशा गुन्हेगारीला आळा घालण्यात शासन आणि प्रशासन कमकुवत ठरत असल्याचे बोलले जात आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.