यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३० मे २४ गुरुवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील रहिवाशी व हमीद हॉटेलचे संचालक लतीफ नथेखा तडवी यांचे आज दि.३० मे २४ गुरुवार रोजी रात्रीच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
लतीफ नथेखा तडवी यांच्या पश्च्यात पत्नी,तीन मुले,दोन मुली,सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.ते हमीद हॉटेलचे संचालक हमीद लतीफ तडवी यांचे वडील होत.लतीफ तडवी यांच्या निधनाबद्दल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.