Just another WordPress site

अमरावती येथील सामाजिक कार्यकर्त्या ज्योत्स्ना शेटे यांचा वाढदिवस अनोख्या उपक्रमाने साजरा

गोपाल शर्मा.पोलीस नायक

विदर्भ विभाग प्रमुख

दि.३० मे २४ गुरुवार

येथील सामाजिक,शैक्षणिक कार्य करणाऱ्या,व्यसनमुक्त अभियान राबविणाऱ्या व प्लस्टिक निर्मूलन जनजाग्रुति करणाऱ्या तसेच गरजू घटका साठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या व दीपज्योती संस्थेच्या अध्यक्षा ज्योत्स्ना शेटे यांचा वाढदिवस दीपज्योती संस्थेच्या वतीने बेघर निवारा केंद्रात अनोखे उपक्रम राबवून मोठ्या उत्साहाच्या वातावरणात नुकताच साजरा करण्यात आला.प्रसंगी वाढदिवसानिमित्ताने दीपज्योती संस्थाध्यक्षा ज्योत्स्ना शेटे यांनी धान्य वाटप करून व काही जीवनावश्यक वस्तू भेट देऊन तसेच सुंदर गाण्याचा कार्यक्रम घेऊन वाढदिवस साजरा केला.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आशिष हाडके,किरणताई मुंदडा,नरेंद्र हेडाऊ,जगदीशसिंग राजपूत,प्रमोद कुटाफळे,प्रकाश शेटे,रेखा बोबडे, आई हाडके,कामिनी खैरे,नरेंद्र हेडाऊ,शालिनी हेडाऊ,छाया कुटाफळे,स्वाती चौधरी,प्रीती चौधरी उपस्थित होते.प्रसंगी सर्व मान्यवराचे दीपज्योतीतर्फे ज्योत्स्ना शेटे व रेखा बोबडे यांनी पुष्पगुछ देऊन स्वागत केले.तर अमरावती जिल्हा माहेश्वरी महिला संगठन सचिव मा. किरणताई मुंढडा व कवी आशिश हाडके यांनी सुंदर कविताद्वारे ज्योत्स्ना शेटे यांना शुभेच्छा दिल्या व ज्योत्स्ना शेटे यांच्या कार्याचा गौरव केला. प्रकाश शेटे यानी मनोगतामधून आपल्या पत्नीचे आपल्या व मुलाच्या जीवनातील महत्व किती मोठे आहे ते सर्वाना सांगितले.त्यावेळी ज्योत्स्ना शेटे फारच भाऊक झाल्या होत्या.दरम्यान रेखा बोबडे,जगदीशसिंग राजपूत व आई हाडके यांनी ज्योत्स्ना शेटे यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले.व्यवस्थापक ज्योती राठोड यांच्या विनंतीवरून अध्यक्षा ज्योत्स्ना शेटे यांनी तेथील तम्बाखु खानाऱ्या आजी-आजोबा यांना तंबाखू ,खर्रा खाण्याचे दुष्परिणाम समजावून सांगितले व तंबाखू न खाण्याची विनंती केली.यावेळी सर्व गायक,गायिका कामिनी खैरे,ज्योत्स्ना शेटे,रेखा बोबडे,स्वाती चौधरी,प्रमोद व छाया कुटाफळे जगदीशसिंग राजपूत,आशिष हाडके,सई हाडके,ज्योती राठोड,राजीव बसवणाथे, शालिनी हेडाऊ व प्रकाश शेटे यांनी अनेक सुंदर गीत सादर करून तेथील वयोवृद्ध आजी-आजोबा यांना आनंदित केले.कार्यक्रमादरम्यान तेथील आजींनी तर आनंदाने काही गाण्यावर नृत्यही केले हे विशेष !.तर आपणही या वयोवृद्धांची थोडी सेवा करावी या उद्दात भावनेने प्रमोद कडूभाऊ,स्वाती चौधरी,रेखा बोबडे,शालिनी हेडाऊ,सई हाडके यांनी मोलाचे सहकार्य व सहयोग दिला.प्रसंगी दीपज्योती संस्थाच्या वतीने उपस्थित वयोवृद्ध आजी व आजोबा यांना जीवनावश्यक वस्तू भेट देण्यात आल्या.प्रसंगी ज्योत्स्ना शेटे,रेखा बोबडे,ज्योती राठोड यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले.कार्यक्रमाची सांगता ज्योत्स्ना शेटे व शालिनी हेडाऊ यांनी आणलेल्या नाश्ता उपस्थितांना देऊन  करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.