दरम्यान रेवण्णा भारतात दाखल होताच कर्नाटक पोलिसांच्या विशेष पथकाने त्याला बंगुळूरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अटक केली त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले तसेच त्याला विशेष न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.जवळपास महिन्याभरापूर्वी कर्नाटकमधील मतदानानंतर हे सगळे प्रकरण उघड झाले.प्रज्वल रेवण्णाच्या ड्रायव्हरनेच या सगळ्या क्लिप असणारा पेनड्राईव्ह पोलिसांच्या हवाली केला होता त्यानंतर पोलिसांनी प्रज्वल रेवण्णाचा शोध सुरू केला मात्र तोपर्यंत तो विदेशात फरार झाला होता व त्याच्याविरोधात लुकआऊट नोटिसाही काढण्यात आल्या होत्या.गेल्या महिन्याभरात त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नव्हता तसेच त्याच्याकडून या संपूर्ण प्रकरणावर कोणतेही भाष्य किंवा बाजू मांडण्यात आली नव्हती.