Just another WordPress site

कोजागिरी पोर्णिमा कशाप्रकारे साजरी केली जाते ? कोजागिरी पौर्णिमेचे महत्व

कोजागिरी पौर्णिमा संबंधित पौराणिक कथेबाबत माहिती

ममता म्हसाने,महाव्यवस्थापक

पोलीस नायक न्यूज 

आपल्या भारत देशातील प्रत्येक राज्यामध्ये वैज्ञानिक तसेच धार्मिक कारणांमुळे मोठ्या उत्साहात आणि आनंदाने कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येत असते.कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा माडी पौर्णिमा असे सुद्धा म्हणले जाते.आज आपण कोजागिरी पौर्णिमेची माहिती तसेच कोजागिरी पौर्णिमेचे महत्व,कोजागिरी पौर्णिमा कशाप्रकारे साजरी करण्यात येते याविषयी विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.कोजागिरी पौर्णिमेची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

कोजागिरी पौर्णिमेला आपला महाराष्ट्र राज्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.कोजागिरी पौर्णिमेला महाराष्ट्र राज्यात माडी पौर्णिमा म्हणून सुद्धा जुनी ओळख आहे.काही राज्यांमध्ये कोजागिरी पौर्णिमेला वेगवेगळे नाव आहे.जसे की कौमुदी पौर्णिमा आणि लोख्खी पुजो इत्यादी.कोजागिरी पोर्णिमा आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी वर्ग सुद्धा मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा करत असतो.मोठ्या प्रमाणात शेतकरी सामूहिकपणे दूध घोटण्याचा कार्यक्रम आयोजित करत असतात.दुधामध्ये चंद्र दिसल्यानंतर ते दूध पिण्याचा आनंद घेत असतात.दुधाबरोबरच विविध पदार्थ देखील या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी बनवण्यात येत असतात.सर्वजण आनंदात आणि उत्साहाने कोजागिरी पौर्णिमा साजरी करतात याचे खास महत्त्व आहे.

कोजागिरी पौर्णिमा २०२२ कधी आहे? :-

यावर्षीची कोजागिरी पौर्णिमा २०२२ ही ९ ऑक्टोबर रविवार या दिवशी आहे.तसेच कोजागिरी पौर्णिमा २०२२ ची सुरुवात ही ९ ऑक्टोबरला संध्याकाळी ७ वाजून ३ मिनिटांनी सुरु होणार आहे.

कोजागिरी पौर्णिमेची विविध नावे कोणती? :- 

कोजागिरी पौर्णिमेला प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे नाव आहे.आपल्या महाराष्ट्र राज्यात आपण कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा माडी पौर्णिमा असे म्हणतो.त्याच प्रमाणे कोजागिरी पौर्णिमेला लोख्खी पुजो,कौमुदी पौर्णिमा,शरद पुनम व आश्विन पौर्णिमा अशी अनेक नावे आहेत.

कोजागिरी पौर्णिमा माहिती :-

कोजागिरी पौर्णिमा संपूर्ण भारतात साजरी केली जातेच परंतु आपल्या महाराष्ट्र राज्यात कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे.खास करून खेड्यामध्ये सर्वजण एकत्र येऊन गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गोड दूध केले जाते.त्यासोबत इतर खाद्यपदार्थ सुद्धा बनवण्यात येतात.आणि चंद्र दिसल्यानंतर सर्वजण मिळून ते खाण्याचा आनंद लुटतात.त्याचप्रमाणे बिहार व झारखंड या राज्यांमध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोजागरहा ही पूजा करण्यात येते.बऱ्याच राज्यामध्ये कोजागिरी पौर्णिमा निमित्त मोठमोठ्या यात्रा भरत असतात.लाखो लोक या यात्रा मध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेत असतात.त्याचप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचे पूजन करण्यात येत असते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सर्व लोक आपापसातील मांडणी तंटे विसरून एकत्र येत असतात आणि कोजागिरी पोर्णिमा साजरी करत असतात.हिंदू सणांपैकी कोजागिरी पौर्णिमा ला सुद्धा धार्मिक,सांस्कृतिक आणि वैज्ञानिक महत्त्व आहे.कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी घोटण्यात येणाऱ्या दुधामध्ये सुकामेवा,काजू,बदाम,चारोळ्या,किसमिस असे अनेक पदार्थ टाकून बनवण्यात येत असते.आणि जोपर्यंत ते घट्ट पेढासारखे बनत नाहीत तोपर्यंत दूध घोटण्यात येत असते त्यानंतर त्याची चव खूप चविष्ट लागते.

कोजागिरी पौर्णिमेचे महत्व :-

कोजागिरी पौर्णिमेला धार्मिक,वैज्ञानिक आणी शास्त्रीय दृष्ट्या असे महत्त्व प्राप्त झालेले आहे.कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या जवळ असतो त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचा उजेड हा जास्त प्रमाणात पृथ्वीवर पडत असतो.चंद्राचा हा उजेड शुद्ध आणि सात्विक असतो असे मानण्यात येते.कोजागिरी अनेक वर्षापासून आपल्या भारत देशात साजरा करण्यात येत आहे.कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पार्वती देवीची सुद्धा पूजा करण्यात येत असते.खास करून आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात कोजागिरी पौर्णिमा हा उत्सव साजरा करत असतात.कोजागिरी पौर्णिमेच्या दरम्यान शेतकऱ्यांची पिके काढायला येत असतात.त्यामुळे सर्वजण त्यांच्या घरात शेतातील पीक म्हणजे लक्ष्मी येत असते.त्यामुळे सर्व शेतकरी बंधू एकत्र येऊन कोजागिरी पौर्णिमा हा उत्सव साजरा करत असतात.त्याचप्रमाणे कोजागिरी हा सण साजरा करण्यामागे सुद्धा एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे.असे म्हणण्यात येते की या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झालेला आहे.तसेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र १६ कलांमध्ये असतो असे मानण्यात येते.

कोजागिरी पोर्णिमा कशाप्रकारे साजरी केली जाते :-

आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोजागिरी पौर्णिमा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये साजरी करण्यात येत असते.कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी महालक्ष्मी देवीची पूजन करण्यात येत असते.बरेच जण या दिवशी उपवास ठेवतात.कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कलशावर महालक्ष्मी देवीची स्थापना करण्यात येते.त्यानंतर देवीची पूजन करण्यात येते श्लोक म्हणण्यात येते.त्याचप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सर्वजण दूध घोटून पीत असतात.कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पिण्यात येणाऱ्या दुधाला वैज्ञानिक तसेच शास्त्रीय कारणे आहेत.या पौष्टिक दुधामुळे अनेक आजार बरे होत असतात असे मानण्यात येते.चंद्राचा सात्विक उजेड हा या दुधामध्ये पडल्यामुळे अनेक रोग बरे होतात असे मानण्यात येते. त्याचप्रमाणे काही भागांमध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गरबा खेळण्याची नवीन प्रथा आलेली आहे.सर्वजण आनंदात एका ठिकाणी बसून गोड दूध मसाला दूध पिण्याचा कार्यक्रम करत असतात.त्यामुळे कोजागिरी पौर्णिमा मुळे एकोप्याचा संदेश जातो.

कोजागिरी पौर्णिमा संबंधित पौराणिक कथा :-

हिंदू सणांमध्ये पौराणिक कथा असते.तसेच कोजागिरी पौर्णिमा या सणाला सुद्धा पौराणिक कथा प्रसिद्ध आहे.ही गोष्ट फार वर्षांपूर्वीची आहे. मगध नावाचे राज्य होते.या राज्यामध्ये एक गरीब आणि सुसंस्कृत असा वलित नावाचा ब्राह्मण राहत होता.परंतु त्याची पत्नी ही त्या ब्राह्मणाप्रमाणे नव्हती ती दृष्ट होती.ब्राह्मण गरीब असल्यामुळे त्याची पत्नी त्याला त्रास द्यायची त्याच्याकडून अनेक कामे करून घ्यायची.त्या ब्रह्मणाला त्याच्या पत्नीचा खूप त्रास होत होता.कारण की त्याची पत्नी त्याला चोरी करायला लावायची.तसेच अनेक वाईट कामे त्या गरीब ब्राह्मणाकडून त्याची पत्नी करून घ्यायची.तसेच एक दिवस हा गरीब ब्राह्मण पूजा करत असताना त्याच्या पूजेमध्ये त्याच्या पत्नीने व्यत्यय घातला होता.आणि त्याची पूजा पाण्यामध्ये फेकून दिलेली होती.आता तो त्याच्या पत्नीला खूप जास्त प्रमाणात कंटाळा आला होता.तिच्या त्रासामुळे तो आता जंगलात निघून गेला.त्याला जंगलामध्ये काही नागकन्या भेटल्या त्याने त्या नागकन्येला त्याची अवस्था समजावून सांगितली. नागकन्यांनी त्या गरीब ब्राह्मणाला कोजागिरी व्रत करण्याचा सल्ला दिला होता.त्याने कोजागिरी व्रत केले आणि तेव्हापासून त्याला सुख-समृद्धी लाभली.तसेच त्याची पत्नी ही आता त्याला त्रास देत नव्हती चांगली झालेली होती.आणि त्यांचा संसार सुखाने नांदत होता.अशाप्रकारे कोजागिरी व्रत करण्याची ही पौराणिक कथा कोजागिरी पौर्णिमा निमित्त प्रसिद्ध आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.