यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१ जून २४ शनिवार
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या वर्षांसाठी शिक्षण हक्क अधिनियम आरईटीच्या माध्यमातुन नागरीकांना आपल्या बालकांना मोफत शिक्षणासाठी २५ टक्के आरक्षित करण्यात आलेल्या जागांसाठी संपुर्ण राज्यात सुधारीत प्रवेश प्रक्रीयेस ऑनलाईन पद्धतीने दि.१७ मे पासुन सुरुवात करण्यात आली असुन दि.४ जुन २०२४ पर्यंत विद्यार्थी व पालकांनी तात्काळ या प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेऊन आपल्या मुला-मुलींसाठी मोफत प्रवेश मिळवून घ्यावा असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
या नविन शैक्षणीक नियमानुसार आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी आपल्या हक्काच्या शिक्षणापासून वंचीत राहू नये याकरीता या शैक्षणिक नियमांची तात्काळ अमलबजावणी करण्यात आली असुन यात आर्थिक व सामाजिकदृष्टया मागासलेल्या घटकांतील विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार आहे.योजनेअंतर्गत विद्यार्थी राहात असलेल्या परिसरापासुन खाजगी शाळा ही १ किलोमिटर लांबीवर राहणाऱ्या पालकांना आपल्या मुलांना मोफत (विनामुल्य ) शिक्षण मिळणार आहे.दरम्यान तालुक्यातील एकुण १७ खाजगी शाळेत प्रवेश मिळण्याच्या प्रक्रीयेला सुरूवात झाली असून दि.१७ मे ते ३१ मे या कालावधीत पर्यंत प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती यावल तालुका गट शिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके यांनी दिली होती.ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत असलेल्या प्रक्रीयेतुन कोणताही विद्यार्थी आपल्या शिक्षणाच्या अधिकारापासुन वंचीत राहू नये या दृष्टीकोणातुन पुणे प्राथमिक शिक्षण संचालनालय विभागाचे संचालक शरद गोसावी यांनी ऑनलाईन प्रक्रीयेची मुदत ही दि.४ जुन २०२४ पर्यंत वाढवली असुन पालकांनी शासनाच्या या मोफत शिक्षण योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आहे.सदर शासन आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या खाजगी शैक्षणिक संस्थांवर कायद्याशीर कार्यवाही करण्यात येईल असे गटशिक्षणधिकारी विश्वनाथ धनके यांनी म्हटले आहे.