आमच्याकडे बऱ्याच लोकांचे निरोप यायला लागले आहे व ४ जूननंतर सुनील तटकरे हेदेखील काही आमदारांसह भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत कारण त्यांना माहिती आहे की आपल्याला शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश मिळणार नाही त्यामुळे ते गोंधळलेल्या अवस्थेत आहे व त्यातूनच ते अशा प्रकारची विधाने करत आहेत असा टोलाही त्यांनी लगावला आहे.आपले आमदार सोडून जाऊ नये किंवा शरद पवारांकडे जाऊ नये यासाठी तटकरेंचे प्रयत्न सुरू आहे.खरेतर अजित पवार गटाच्या नेत्यांची काही भाषणे बघितली तर ते लोक पराभवाच्या मानसिकतेत आहेत हे स्पष्टपणे दिसून येत आहे.अजित पवारांची नाव आता बुडायला लागली आहे त्यामुळे सुनील तटकरे आता भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे असेही मेहबूब शेख यांनी म्हटले आहे.