सांगलीत ब्राह्मण समाज संघटनेतर्फे ब्राह्मण समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या सत्कार मेधा कुलकर्णींच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले आणि अमोल मिटकरींबाबत काय भूमिका घेतली तेदेखील सांगितले.या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर अमोल मिटकरींनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.लोकसभा आणि राज्यसभा ही दोन्ही सभागृह भारतीय संविधानाच्या चौकटीत येतात.ज्यावेळेस या दोन्ही सभागृहांपैकी एकाचा कुणी व्यक्ती सदस्य होतो त्यावेळेस त्याला जी शपथ दिली असते ती महत्त्वाची असते. खासदारकीची शपथ दिल्यानंतर तो सदस्य कुठल्याही एका समाजाचा राहात नाही तो देशाचा होतो.जर शपथ घेतल्यानंतर आपण एका समाजापुरते आहोत असे कुणी वागत असेल तर भारतीय संविधानाच्या विचारधारेला ते छेद देण्यासारखे आहे असाच प्रकार सांगलीत राज्यसभेच्या खासदारांकडून घडला असे अमोल मिटकरींनी म्हटले आहे.बारामतीत युवक मेळावा होता त्या युवक मेळाव्यात सूरज चव्हाणही उपस्थित होते.मी त्यांच्याबरोबरच गेलो होतो त्यावेळी या सदस्या स्टेजवर बसल्या होत्या मला आयोजकांकडून जेव्हा समजले तेव्हा मी तिथून निघून गेलो मीच तिथे थांबलो नाही अशा लोकांसह मलाच बसायचे नाही जे स्वतःला एका समाजाचे समजतात.जर जबाबदारा नागरिक असाल तर तुम्ही कुणा एका समाजाचे असत नाहीत.मीच तिथून गेलो त्या बसून होत्या.इतक्या दिवसांपूर्वीचं वक्तव्य त्यांनी उकरुन काढले आणि टाळ्या मिळवल्या.एका पदावर असतांना एका समाजासाठी काम करत असतील तर हा भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत तत्त्वाला छेद देण्याचा प्रकार आहे.जर असेच चालू राहिले तर जनतेच्या मनात जी शंका राज्यघटनेबाबत येते आहे त्याला अधिकृत दुजोरा मिळेल त्यामुळे त्यांनी केलेले वक्तव्य साफ चुकीचे आणि खोटे आहे.समाजाची दिशाभूल करणारे आहे.स्टेजवर त्या आल्या नव्हत्या असे नाही त्या आहेत हे कळल्यावर मी गेलो नव्हतो हे निर्विवाद सत्य आहे असे अमोल मिटकरी म्हणाले.टीव्ही ९ मराठीला त्यांनी याबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.