दरम्यान निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच नागरिकांना महागाईचा झटका बसला आहे.गुजरात कॉर्पोरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (जीसीएमएमएफ) अमुल दुधाच्या किंमतीत प्रती लीटर दोन रुपयांनी वाढ केली आहे.दुधाच्या वाढलेल्या किंमती आजपासून सोमवार दि.३ जून पासून लागू झाल्या आहेत.जीसीएमएमएफने केलेल्या घोषणेनुसार अमुल दूध दोन रुपयांनी महागले आहे.अमुलने जाहीर केलेल्या नव्या किंमतींनुसार ‘अमुल गोल्ड’च्या अर्धा लीटरच्या पाऊचसाठी (पिशवी) आता ३२ ऐवजी ३३ रुपये मोजावे लागणार आहेत म्हणजेच ग्राहकांना अमुल गोल्डच्या एक लीटर पाऊचसाठी आता ६४ ऐवजी ६६ रुपये खर्च करावे लागणार आहेत.‘अमुल ताजा’साठी (अर्धा लीटर) २६ ऐवजी २८ रुपये, ‘अमुल शक्ती’साठी (अर्धा लीटर) २९ ऐवजी ३० रुपये मोजावे लागणार आहेत.दुधाच्या वाढलेल्या किंमतींमुळे सामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.