Just another WordPress site

थोरपाणी येथे मरण पावलेल्यांच्या वारसाला ५ लाखाची मदत देण्याची मदत व पुनर्वसन मंत्र्यांची घोषणा

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.३ जून २४ सोमवार

तालुक्यातील आंबापाणी (थोरपाणी) या सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम अशा क्षेत्रात राहणाऱ्या नानसिंग पावरा यांच्यासह त्यांच्या पत्नी व दोन लहान मुलांचा वादळात घर कोसळुन दुदैवी मृत्यु झाला होता.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे पदाधिकारी यांनी जिल्ह्यातील मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांची अमळनेर येथे भेट घेत यावल तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्त पीडित आदिवासी कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी म्हणून पक्षाच्या वतीने मागणी करण्यात आली होती.

सदरील मागणीला प्रतिसाद देत तात्काळ यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर व जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद जळगांव व मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन कक्षाला तात्काळ सूचना देऊन तात्काळ त्या आपदाग्रस्त कुटुंबांना भरीव अशी मदत मिळवून देण्याचे आदेश ना. मंत्री महोदयांनी काल दिले असून त्यात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनच्या माध्यमातून प्रत्येकी ४ लाख रुपये तर मुख्यमंत्री सहायता निधी मधून प्रत्येकी १ लाख अशी २० लाख रूपयांची मदत ही त्या पिडित कुटुंबियांच्या वारसांना देण्याबाबतच्या सुचना संबंधीत विभागाला देण्यात आल्या आहेत.या घटनेनंतर सर्व स्तरातून राजकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडित कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले होते. त्यात यावल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा अंमळनेर येथे जाऊन महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांची प्रत्यक्ष अमळनेर येथे भेट घेऊन पीडीत कुटुंबाला लवकर मदत देण्यासाठी विनंती केली.याप्रसंगी यावल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ॲड.देवकांत पाटील,राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष राकेश सोनार,राष्ट्रवादी सामाजिक विभागाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र सपकाळे,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राकेश पाटील,कोरपावलीचे सरपंच तथा सामाजिक आघाडी तालुका अध्यक्ष विलास अडकमोल,चुंचाळे तेथील छत्रपती फाऊंडेशनचे संचालक विनोद पाटील,वरडसीमचे ग्रा.पं.सदस्य विलास पाटील,राष्ट्रवादी भुसावळ माजी युवक अध्यक्ष अतुल चव्हाण आदी या प्रसंगी उपस्थिती होते.

Leave A Reply

Your email address will not be published.