कुठल्या आचारसंहितेचे उल्लंघन उद्धव ठाकरेंनी केले ? २० मे रोजी त्यांनी पत्रकार परिषद घेतली पण तो काही प्रचाराचा भाग नव्हता. पत्रकारांशी त्यांनी चर्चा केली मात्र मुंबईतले भाजपाचे पदाधिकाऱ्यांनी पत्र लिहिले आणि निवडणूक आयोगाने लगेच कारवाई केली.उद्या ४ नंतर निवडणूक आयोगासारख्या भाजपाच्या सगळ्या शाखा बरखास्त होतील असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.ज्या १५० मतदारसंघात धमक्या दिल्या जात आहेत त्यातले १२ मतदारसंघ महाराष्ट्रातले आहेत अशी माझी पक्की माहिती आहे.उद्या भाजपाचा पराभव होणार आहे. लाडू वाटा,जिलबी वाटा,बासुंदी वाटा,फाफडा वाटा आणि सगळ्या लोकांना वाटा कारण तुमचा पराभव निश्चित आहे व लोक आनंद उत्सव साजरा करतील.उद्या संध्याकाळी ४ नंतर माजी पंतप्रधान होतील आणि इंडिया आघाडीचे सरकार येईल त्यानंतर चोवीस तासांत आमचा पंतप्रधान जाहीर होईल असाही दावा संजय राऊत यांनी केला.पंतप्रधानपदावर आमच्या आघाडीत कुठलेही मतभेद नाहीत.उद्या सगळे निकाल लागले आणि इंडिया आघाडीचा विजय जाहीर झाला की आम्ही पंतप्रधानपद ठरवू.लोकांना मोदी सध्या भ्रमात टाकत आहेत व उद्यापासून ते माजी पंतप्रधान असतील असे संजय राऊत यांना नमूद केले आहे.