वर्धा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.४ जून २४ मंगळवार
स्थानिक निर्मल बेकरी चौकात असलेल्या एका पोलवार बॅनर लावण्याचे काम सूरू होते व त्याचवेळी रस्त्यावरून भरधाव निघालेल्या ट्रकने या ठिकाणी धडक दिली त्यात मैदानकाल परिसरात राहणारा एकोणवीस वर्षीय सुनील बेहरा हा युवक जागीच ठार झाला तर उरदानंद बेहरा व राजेश बेहरा हे दोन जण गंभीर जखमी झाले आहे.यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. हे तिघेही ओडिसा राज्यातील रहिवासी असून ते कंत्राटी पद्धतीने कामावर आले होते.सदरील घटना आज मंगळवार रोजी पहाटे घडली आहे.
७ जून पासून वर्ध्यात जादूगर शो होत आहे व त्याची ठिकठिकाणी प्रसिद्धी केल्या जात आहे त्यासाठी हे मजूर आले होते ते तिघेही मोटर सायकल (क्र.ओ आर ०४ एटी ७२५७) यावर उभे होत निर्मल बेकरी चौकात बॅनर लावण्याचे काम करीत होते त्यांना (यू पी. ७५ ए टी ०२०३) या क्रमांकाच्या ट्रकने धडक दिली.अपघात झाल्यानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.घटनेची माहिती मिळताच वर्धा शहर पोलीसांनी अपघातस्थळी भेट देत विचारपूस सूरू केली.आज पहाटे चार वाजता हा अपघात घडला आहे.जखमी युवकांना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.