नितीश कुमार यांनी पंतप्रदान नरेंद्र मोदी व एनडीएला पूर्ण समर्थन असल्याचे स्पष्ट केले आहे.२०१९च्या निवडणुकीत नितीश कुमार यांचे १६ खासदार निवडून आले होते त्यावेळी त्यांना केंद्रात फक्त एक मंत्रीपद देण्यात आले होते यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे.यावेळी नितीश कुमार यांच्या जागा ४ ने घटून १२ वर आल्या आहेत पण भाजपाला स्वबळावर बहुमत न मिळाल्यामुळे आता नितीश कुमार एकऐवजी तीन मंत्रीपदांसाठी आग्रही असतील अशी माहिती समोर आली आहे.व येत्या ८ किंवा ९ जून रोजी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.इंडियन एक्स्प्रेसने पक्षातील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार,नितीश कुमार रेल्वे,ग्रामविकास आणि जलशक्ती या तीन मंत्रालयांसाठी आग्रही असण्याची शक्यता आहे.जर या तीन मंत्रालयांवर घासाघीस झाली तर वाहतूक आणि कृषी या खात्यांचे पर्याय दिले जातील.नितीश कुमार यांनी पहिली तीन खाती याआधी एनडीएच्या सरकारमध्ये हाताळली आहेत.बिहारच्या विकासासाठी फायदेशीर ठरतील अशी खाती आमच्या मंत्र्यांनी सांभाळावीत यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत.बिहारमधील पाण्याचा प्रश्न पाहता जलशक्ती खाते महत्त्वाचे आहे असे पक्षातील एका नेत्याने सांगितल्याचे इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात नमूद केले आहे.