मी अत्यंत कटुतेने बोलतो आहे कारण राजकारणातली पिढी संपवायचे काम फडणवीसांनी केले.हातातल्या सत्तेचा वापर राजकारणात सूड घेण्यासाठी केला.न्यायालयांवर दबाव आणला,न्यायमूर्तींवर दबाव आणला,धमक्या देण्यात आल्या.पोलिसांचा वापर राजकीय कामांसाठी केला या सगळ्याचा उद्रेक होतोच.आज लोकांनी त्यांना उत्तर दिले.जेवढा राग मोदी शाह यांच्यावर नाही तेवढा देवेंद्र फडणवीसांवर आहे.विदर्भात नितीन गडकरींची जागा सोडली तर विदर्भात फडणवीसांची भाजपा रसातळाला गेली.राजीनामा द्यायची गरज काय ? लोकांनीच तुम्हाला घरी पाठवले आहे.सूडाचे,जाती-धर्माचे राजकारण सुरु करुन राज्य रसातळाला नेले.आधी त्यांनी स्वतःच्या घरात काय झाले आहे ते फडणवीसांनी बघावे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.नवाब मलिक,अनिल देशमुख यांना जाऊन भेटा,महापालिकेतल्या लोकांवर खोट्या कारवाया केल्या.आज त्यामुळेच त्यांच्यावर रडण्याची वेळ येईल.मी पुन्हा येईन,दोन पक्ष फोडून येईन जे दोन पक्ष त्यांनी फोडले त्याच पक्षांनी त्यांच्यावर अश्रू ढाळण्याची वेळ आणली आहे.अजून तुम्हाला बरेच काय काय बघायचे आहे.जे काही करायचे आहे ते करा पण महाराष्ट्राच्या इतिहासात तुमचे नाव काळ्याकुट्ट अक्षरांत लिहिले जाईल.तुम्ही महाराष्ट्राची वाट लावलीत,मराठी माणसाच्या स्वाभिमानाची वाट लावलीत.बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तुम्ही फोडलीत याचा सूड महाराष्ट्र तुमच्यावर सातत्याने घेत राहिल असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस किंवा इतर कुणीही त्यांनी त्यांच्या पक्षात काय करावे हा आमचा प्रश्न नाही पण महाराष्ट्रात त्यांनी दळभद्री आणि घाणेरडे राजकारण केले.लोकसभा निवडणुकीत त्यांना जागा दाखवली.ज्या गुदगुल्या त्यांना काही काळ झाल्या त्या अस्वलाच्या गुदगुल्या होत्या असाही टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.माझ्या माहितीप्रमाणे नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा मार्ग सरळ नाही.गेल्या दोन निवडणुकांमध्ये त्यांनी ज्या रुबाबात मोदी पुढे जात होते ते चित्र आज दिसत नाही.मोदींची भाषा बदलली आहे.बॉडी लँग्वेज बदलली आहे.संघाचा विरोध आहे, पक्षांतर्गत विरोध आहे.मोदी एका अर्थाने पराभूत झालेत असा माणूस पंतप्रधान कसा होऊ शकतो ? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.