यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :-
दि.७ जून २४ शुक्रवार
यावल आगारातुन सकाळी ७ व ७:३० वाजता यावल ते पुणे अशा लागोपाठ दोन बसेस भुसावळ जामनेर मार्गे पुणे येथे जात असतात मात्र यावल तालुक्याच्या पश्चिम भागाकडुन यावल आगाराची एकही बस पुणे जात नसल्यामुळे या भागातील प्रवाश्यांना पुणे येथे जाण्यासाठी जळगाव येथुनच प्रवास करावा लागतो.
मात्र यावल आगाराने जर सकाळीची एक बस साकळी,किनगाव,डांभुर्णी,विदगाव,जळगाव व छत्रपती संभाजीनगर मार्गे पुणे जाण्यासाठी सुरू केली तर तालुक्यातील पश्चिम भागातील बहुतांशी प्रवाश्यांना याचा फायदा होईल व यावल आगाराला ही बससेवा सुरू करून उत्पन्नही चांगले येईल.तरी यावल ते पुणे बससेवा डांभुर्णी मार्गे सुरू करावी अश्या आशयाचे निवेदन डांभुर्णी ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचे पत्र यावल आगर व्यवस्थापक दिलीप महाजन यांना नुकतेच देण्यात आले आहे.यावेळी ग्रा.प.सदस्य शुभम गिरीश विसवे,लोकेश जयवंत सोनवणे,भुषण शालीक साठे,उमाकांत प्रकाश पाटील इ.सह ग्रामस्थ उपस्थीत होते.