शिंदे गटाचे खासदार चोऱ्यामाऱ्या करुन निवडून आले आहेत.माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांना परदेशात चार हाय कमिश्नरची पदही देणार आहेत त्यांनी मागितलेत असे कळलय.अजून काय काय मागणार आहेत माहीत नाही.चोऱ्यामाऱ्या करुन निवडून आलेत.चोरलेला पक्ष,चोरलेले विजय अमोल किर्तीकरांसारखे त्यामुळे काही दिवसांनी हाय कमिश्नर म्हणून निवडलेले दिसतील असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.देवेंद्र फडणवीस दिल्लीत जात असतील तर तो त्यांचा निर्णय.त्यांच्या पक्षाचे हायकमांड दिल्लीत आहे.महाराष्ट्रात पराभव झालाय तर तिथे बोलवले गेले.आमचा पराभव जिथे झाला त्याची मीमांसा आम्ही करणार आहोत तसे भाजपालाही करावेच लागेल. महाराष्ट्रात काय करायला गेलो आणि काय झाले ? यावर चिंतन होईल हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे असे संजय राऊत म्हणाले.काँग्रेसने खोटे काहीही सांगितले नाही.खोटे बोलणारे नरेंद्र मोदी आहेत.खोट्यांचे सरदार मोदी आहेत.देवेंद्र फडणवीस छोटे सरदार आहेत.एक बडा राजन आणि दुसरा छोटा राजन.खोटे बोलण्यास सुरुवात कुणी केली तर मोदी आणि शाह यांनी केली त्यामुळे त्यांनी आम्हाला काही गोष्टी शिकवायला जाऊ नये असे म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना उत्तर दिले आहे.