“लोकांचा विश्वास बॅलेट पेपरवर आहे तर मग तिच पद्धत तुम्ही का आणत नाही ?” !! जितेंद्र आव्हाड यांचा नरेंद्र मोदींना सवाल
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.८ जून २४ शनिवार
ईव्हीएमवर आमचा विश्वासच नाही असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना उत्तर दिले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल संसदीय नेतेपदावर निवड झाली त्यावेळी त्यांनी भाषण केले व या भाषणात त्यांनी ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला तसेच यावेळी मला वाटले होते की ईव्हीएमची प्रेतयात्रा लोक काढतील असे मला वाटले होते असा टोला नरेंद्र मोदींना विरोधकांना लगावला त्यावर जितेंद्र आव्हाड यांना विचारले असता जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिले आहे.४ जूनचे निकाल लागत असतांना मी माझ्या काही कामांमध्ये व्यग्र होतो.मला नंतर फोन येऊ लागले.मी त्यानंतर कुणाला तरी म्हटले की ठीक आहे हे सगळे पण मला एक सांगा ईव्हीएम जिवंत आहे की मेलय ? या लोकांनी ठरवून टाकले होते की लोकशाहीवरुन लोकांचा विश्वास उडाला पाहिजे.यावेळी तर ईव्हीएमची प्रेतयात्रा निघेल असे वाटले होते पण त्या ईव्हीएमनेच विरोधकांची तोंड बंद केली.निवडणूक आयोग,लोकशाहीची ताकद त्यादिवशी सगळ्यांनाच कळली असे म्हणत नरेंद्र मोदींनी टीका केली होती त्यावर आता जितेंद्र आव्हाडांनी उत्तर दिले आहे.
ईव्हीएमवर आमचा आणि जनतेचा विश्वास नाहीच त्यामुळे त्यावर प्रश्न विचारले जाणारच.लोकशाहीत जनतेच्या मनात काय आहे त्याला जास्त महत्त्व आहे.ईव्हीएम मॅनेज होत नाही असे कुणी म्हणत असेल तर ते संपूर्णतः चुकीचे आहे.ईव्हीएम मॅनेज होते.निवडणूक आयोगाने न्यायालयात सांगितले की ईव्हीएम चार तासात निकाल कसे चुकले ? रविंद्र वायकर विरुद्ध अमोल किर्तीकर यांचेच उदाहरण बघा.ईव्हीएम मध्ये कॅलक्युलेटर आहे त्यात चुका कशा होतात ? लोकांचा विश्वास बॅलेट पेपरवर आहे व तीच पद्धत आली पाहिजे.लोकांचे मतच मी सांगतो. विरोधी पक्षांनी लोकांना भ्रमित केले म्हणून तुमच्या विरोधात मतदान झाले का ? असे झालेले नाही,लोकांना पटले नाही तर नाही.लोकांना अजूनही संशय आहे तर तो दूर करुन टाका व बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या असे आव्हाड यांनी म्हटले आहे.निवडणूक लढवत असणाऱ्या तुमच्या उमेदवारांनी सांगितले आम्हाला अपेक्षित संख्या मिळाली तर संविधान बदलणार.संशय तुम्ही तयार केला आहात.लोकांना संशय आल्यानंतर लोकांनी मतदान केले.महाराष्ट्रात मनुस्मृती आणण्याचे प्रयत्न झाले.दीपक केसरकर म्हणाले होते की काही श्लोक आणले तर बिघडले कुठे ? सरकारने मला पुढे करुन विषय दडपण्याचा प्रयत्न केला मात्र मी शांत बसणार नाही.मनुस्मृती आम्ही आणणार नाही हे केसरकर सांगत नाहीत तोपर्यंत आम्ही विश्वास कसा ठेवायचा ? असा प्रश्नही आव्हाडांनी विचारला आहे.