नितीन गडकरी यांच्या या कृतीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.नितीन गडकरींच्या कृतीची तुलना इतिहासातील हिटलरच्या एका प्रसंगाशीही अनेकांनी केली आहे.हिटलरसमोर नाझी सेना,अधिकारी मान तुकवत असतांना एखाच सैनिक शांतपणे बसून राहिल्याचे मिम यानिमित्ताने पोस्ट केले जात आहेत.पण एनडीएच्या बैठकीतील हा एकच व्हिडीओ घेऊन नितीन गडकरी ट्रेंड झाले असे नाही.भाजपा  विरोधकांनी जेव्हा नितीन गडकरींच्या कृतीवरून मोदींना घेरण्यास सुरुवात केली तेव्हा भाजपा समर्थकांनीही इतर प्रसंगाचे व्हिडीओ बाहेर काढले.एएनआय या वृत्तसंस्थेने एनडीएच्या बैठकीचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूबवर पोस्ट केलेला आहे.या व्हिडीओत पंतप्रधान मोदी सभागृहात आल्यानंतर आणि त्यांनी संविधान माथ्याला लावून अभिवादन करत असतांना दोन वेळा नितीन गडकरी आपल्या जागेवरून उठून प्रतिसाद देतांना आणि मोदींचे स्वागत करतांना दिसत आहेत.

nitin gadkari standing
नरेंद्र मोदी सभागृहात आल्यानंतर नितीन गडकरींनी उभे राहून अभिवादन केले.

भाजपा समर्थकांकडून दुसऱ्या बाजूचेही व्हिडीओ समोर आले आहेत.या संपूर्ण कार्यक्रमात नितीन गडकरी हे दोन ते तीन वेळा मोदींना अभिवादन करण्यासाठी उभे राहिल्याचे दिसून येते.नरेंद्र मोदी आपल्या भाषणाची सुरुवात करत असतांना सर्व सभागृहाने उभे राहून त्यांचे अभिवादन केले होते त्यात गडकरींचाही समावेश होता.

nitin gadkari standing 2
नरेंद्र मोदी भाषणासाठी आल्यानंतर नितीन गडकरींनी सर्व सभागृहासह त्यांना उभे राहून अभिवादन केले.

नितीन गडकरी यांचे असे व्हिडीओ पहिल्यांदाच व्हायरल झाले असे नाही याआधीही लोकसभेत अनेकवेळा नितीन गडकरी मोदींच्या भाषणात बाक न वाजवता शांतपणे बसून राहिल्याचे व्हिडीओ समोर आले होते मात्र त्याची चर्चा कालच्या बैठकीएवढी कधी झाली नव्हती.लोकसभेत भाजपाला म्हणावे तितके यश मिळाले नाही.विरोधकांनी मोदींच्या नेतृत्वावर शंका उपस्थित करत त्यांच्यावर टीका केली त्यामुळे नितीन गडकरींची ही कृती अधिक चर्चेत आली असावी असाही अंदाज बांधला जात आहे.