Just another WordPress site

डोंगर कठोऱ्याचे सुपुत्र डिगंबर तायडे यांच्या कामगिरीची ‘युएसए बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद

डिगंबर तायडे यांच्या अफलातून कामगिरीचे सर्व थरातून कौतुक

मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.८ जून २४ शनिवार

जळगाव जिल्ह्यातील डोंगर कठोरा या सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या खेडेगावातील सुपुत्र व सध्या डोंबिवली मुंबई येथील मुंबई प्राधिकरणात सिव्हिल इंजिनिअर म्हणून कार्यरत राहून सेवानिवृत्त होऊन वास्तव्यास असलेले डिगंबर सिताराम तायडे यांनी गायनाच्या सातत्यपूर्ण व दैदिप्यमान कामगिरी केल्याबद्दल त्यांच्या कामगिरीची युएसए ने दखल घेतली असून त्यानिमित्ताने डिगंबर तायडे यांच्या कामगिरीची ‘युएसए बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नुकतीच नोंद करण्यात आली आहे.डिगंबर तायडे यांच्या अफलातून कामगिरीचे सर्व थरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.डिगंबर तायडे यांनी याआधी फिनौमिनाल म्युजिक ग्रुप तर्फे संपूर्ण भारत भरात घेण्यात आलेल्या गाण्याची प्रतियोगिता स्पर्धेत विश्व विजेतेपद पटकावले होते हे विशेष ! सदरील पुरस्कार हा माझ्या संपूर्ण करीयरची मिडीयाने घेतलेली दखल असून हा माझा लाईफ टाईम स्पर्धेचा मोठा सन्मान असल्याची भावना डिगंबर तायडे यांनी पोलीस नायक प्रतिनिधी जवळ बोलतांना दिली आहे.डिगंबर तायडे यांना त्यांच्या यशात सामाजिक,शैशाणिक,क्रीडा क्षेत्रा सोबत क्रिकेट,क्यारम,म्यारेथान अशा विविध स्पर्धेत निपुण कामगिरी करून ‘महाराष्ट्र ची हिरकणी’पुरस्कार प्राप्त तसेच नेहमीच डिगंबर तायडे यांच्या खांद्याशी खांदा लाऊन कार्यास हातभार लावणाऱ्या त्यांच्या पत्नी सौ.शकुंतला तायडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.डिगंबर तायडे यांच्या कामगिरीची ‘युएसए बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नुकतीच नोंद झाल्याबद्दल त्यांनी डोंगर कठोरा वासीयांच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवण्याची परंपरा कायम राखत पुन्हा एकदा डोंगर कठोरा वासीयांच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे.परिणामी त्यांच्या या कामगिरीचे सर्वच थरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

विशेष बाब म्हणजे डिगंबर तायडे हे दिवसागणीक रोज नवनवीन यशोशिखर गाठत असून त्याचाच एक भाग म्हणून ज्ञान उद्देक फाउंडेशनच्या वतीने रीडीयंट टॅलेंट बुक ॲाफ रेकार्ड मद्धे नोंद करण्यात आली असून यशोशिखरात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.परिणामी त्याचाच परिपाक म्हणून दि.१४ जुलै रविवार रोजी पुणे येथे डिगंबर तायडे व शकुंतला तायडे या दाम्पत्याचा सत्कार तसेच हॅानर ऑफ ईनक्रेडेबल ऑफ  ईन्डीया तर्फे “आयकॅन ऑफ नॅशनल आवार्ड@ ने सन्मानीत करण्यात येणार आहे.दरम्यान या दाम्पत्यांच्या पुरस्कारांमध्ये दिवसेंदिवस भर पडत असून या दाम्पत्याची “जगावेगळी कर्तृत्ववान जोडी” अशी ख्याती या जोडीने मिळविली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.