मणिपूरच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला.आमचे म्हणणे आहे की,अमित शाह हे गृहमंत्रीपदाचा वापर हा कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी करत नाहीत ते आपल्या राजकीय विरोधकांचा काटा काढण्यासाठी याचा वापर करतात.ते विरोधकांना संपवू शकतात पण दहशतवाद्यांना संपवू शकत नाहीत.भष्ट्राचाऱ्यांना आपल्या पक्षात घेतात पण काश्मिरी पंडितांना त्यांच्या घरी पाठवू शकले नाही.नरेंद्र मोदींनी असे गृहमंत्री पुन्हा एकदा देशाच्या छातीवर बसवून या देशातील शहिदांचा अपमान केला आहे.कायदा सुव्यवस्थेला धोका कोणापासून असेल तर गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून आहे कारण ते कायदा आणि सुव्यवस्थेबाबत विचार न करता ते फक्त राजकीय विचार करतात त्यामुळे जेव्हापासून अमित शाह गृहमंत्री झाले तेव्हापासून जम्मू-काश्मीर आणि मणिपूर अशांत आहे.यावरून नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला पाहिजे असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.