राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर अनेक पुस्तके लिहिलेल्या रतन शारदा यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या पराभवाला नको असलेले राजकारण कारणीभूत असल्याचे म्हटले आहे व यासाठी त्यांनी महाराष्ट्राचे उदाहरण दिले.महाराष्ट्रात काही गोष्टी टाळता आल्या असत्या.जसे की भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे बहुमत असतांनाही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बरोबर घेतले गेले यामुळे कित्येक वर्ष काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात लढत असलेल्या भाजपाच्या समर्थकांना धक्का बसला व या एका कारणामुळे भाजपाने आपली किंमत कमी करून घेतली अशी टीका रतन शारदा यांनी केली आहे.रतना शारदा यांनी आपल्या लेखात पुढे म्हटले की,राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सदस्य हे भाजपाचे मैदानावर काम करणारे कार्यकर्ते नाहीत.स्वंयसेवकांची मदत मागण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते आणि नेते कुठेतरी कमी पडले.विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीचे पहिले दोन टप्पे झाल्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एका मुलाखतीत राष्ट्रीय स्वंयसवेक संघावर केलेले भाष्य वादाचा विषय ठरले होते.अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळातील भाजपा पक्ष आणि आताचा भाजपा पक्ष यात बराच फरक असल्याचे ते म्हणाले होते.भाजपा आता मजूबत पक्ष बनला असून आम्हाला संघाच्या मदतीची गरज उरली नसल्याचे ते म्हणाले होते.रतन शारदा यांनी ऑर्गनायझरच्या लेखात कुणाचेही नाव न घेता भाजपा नेत्यांच्या अतिआत्मविश्वासावर टीका केली आहे.लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल भाजपा कार्यकर्ता आणि नेत्यांना वास्तवाचे भान आणून देण्यास पुरेसे आहेत असेही रतन शारदा यांनी नमूद केले आहे.