यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१३ जून २४ गुरुवार
येथील यावल-भुसावळ मार्गावर पहेलवान यांच्या ढाब्याजवळ आज दि.१३ जून रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत हरिणाचा दुदैवी मृत्यु झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.दरम्यान वन विभागास सामाजिक कार्यकर्त्यांनी संपर्क साधुन माहीती दिल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील सोपस्कार आटोपल्याचे वृत्त आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की,यावल-भुसावळ मार्गावरील अंजाळे गावाजवळ असलेल्या पहेलवान याच्या ढाब्याजवळ आज दि.१३ जून रोजी रात्रीच्या वेळीस कुणीतरी अज्ञात वाहनाने सदर हरीणाला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यु झाल्याची घटनासमोर आली.या घटनेची माहीती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष चेतन आढळकर व परिसरातील नागरीकांना मिळताच त्यांनी तात्काळ यावलचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे यांना दिली व त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे यांनी आपल्या वन विभागाच्या पथकासह तात्काळ त्या घटनास्थळी धाव घेत मरण पावलेल्या हरिणला ताब्यात घेतले आहे.उद्या शासकीय नियमानुसार त्या मरण पावलेले हरिणचा अंत्यविधी करण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फटांगरे यांनी दिली आहे.