मराठा आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत राहून सोडवू यावर येणाऱ्या हरकती या मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर ठेवल्या जातील असे शंभूराज देसाई म्हणाले तसेच मागील दोन महिने राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू होती त्यामुळे यासंदर्भातील निर्णय घेण्यास विलंब झाला.मात्र यासंदर्भात मी उद्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे व सगेसोयऱ्यांच्या नियमांची अधिसूचना काढण्याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी मनोज जरांगे यांना दिले आहे.दरम्यान शंभूराज देसाई यांच्या आश्वासनानंतर आता मनोज जरांगे यांनी उपोषण मागे केले असून त्यांनी राज्य सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे.तसेच १३ जुलैपर्यंत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत नाव घेऊन उमेदवार पाडू असा इशारा देखील त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.लोकांचा शब्द डावलून जर एक महिण्याच्या आत मागण्या मान्य न झाल्यास आम्ही निवडणुकीत उतरणार,ते शक्य नाही झाले तर २८८ मतदानसंघात नाव घेऊन उमेदवार पाडू असे ते म्हणाले.शंभूराज देसाई आले म्हणून मी सरकारला एक महिन्याची वेळ देतो आहे जर एक महिन्यात आरक्षण न मिळाल्यास आपण सत्तेत जाऊन आरक्षण घेऊ अशी प्रतिक्रियाही मनोज जरांगे यांनी दिली आहे.