दरम्यान सुनेत्रा पवार यांना यावेळी विचारण्यात आले की तुमचा पक्ष केवळ अजित पवार यांच्या कुटुंबापुरता सीमित झाला आहे अशी टीका होत आहे त्याबाबत काय सांगाल ? त्यावर सुनेत्रा पवार म्हणाल्या,माझ्या उमेदवारीचा निर्णय पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांनी मिळून घेतला आहे. आज माझा उमेदवारी अर्ज भरताना स्वतः छगन भुजबळ यांच्यासह पक्षातील इतर नेतेही उपस्थित होते व त्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्यामुळे मी ठामपणे सांगेन की पक्षात कोणत्याही प्रकारची नाराजी नाही.सुनेत्रा पवार म्हणाल्या,माझ्या उमेदवारीबाबत जनतेतून मागणी होत होती. अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी देखील अशी मागणी केली होती मात्र मी आमच्या कार्यकर्त्यांना विनंती केली की माझ्या उमेदवारीचा अग्रह धरू नये.मात्र त्यांनी माझ्या उमेदवाराची मागणी लावून धरली,खूप मोठ्या प्रमाणात मागणी झाल्यानंतर पक्षाने हा निर्णय घेतला.सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे देखील राज्यसभेच्या उमेदवारासाठी इच्छुक होते त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या उमेदवारी अर्जामुळे ते देखील नाराज असल्याची चर्चा आहे.यावर सुमित्रा पवार म्हणाल्या.पार्थ पवार यांनी देखील मला सांगितले की कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार तुम्हीच राज्यसभेसाठी अधिकृत उमेदवार असले पाहिजे.स्वतः पार्थ पवार यांचा देखील तसाच अग्रह होता.